भूखंड बळकावल्याप्रकरणी काँग्रेसचा नगरसेवक हरीश ग्वालबन्सीला अटक

भूखंड बळकावल्याप्रकरणी काँग्रेसचा नगरसेवक हरीश ग्वालबन्सीला अटक

नागपूर – लोकांच्या प्लॉटवर जबरीने कब्जा करून प्लॉटवरील ताबा सोडण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी शहर गुन्हे शाखा पथकाने कॉंग्रेसचे नगरसेवक हरीश मोहन ग्वालबन्सी यास अटक केली आहे. एसआयटीचे प्रमुख सहाय्यक आयुक्त सौमनाथ वाघचौरे यांनी भूमाफीया दिलीप ग्वालबंशीच्या टोळीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे शहरातील इतर भूमाफीयांचे धाबे दणाणले होते. यामुळे गुन्हे शाखेकडे भूमाफींयाविरोधात तक्रारींचा ओघ वाढला आहे.
राऊत ले -आऊट, केशवनगर, झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी संजयसिंग बैस (53) यांनी या भूमाफीया विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 1999 मध्ये त्यांनी नर्मदा को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मालकीचा हजारी पहाड खसरा नं. 7/1 मधील ले-आऊट पैकी प्लॉट नं. 74 क्षेत्रफळ 1200 चौ. फुटाचा भूखंड खरेदी केला होता. तसेच प्लॉट नं. 75 क्षेत्रफळ 1200 चौ. भूखंड पुष्पलता बैस यांच्या नावे खरेदी केला होता. त्यामुळे त्यांनी सुरक्षेच्या दुष्टीने दोन्ही प्लॉटच्या सभोवताल सिमेंटचे खांब उभे करुन कंपाऊंडचे बांधकाम केले. 20 मे रोजी याच भूखंडावर हरीश ग्वालबंशीसह त्याच्या साथीदारांनी आपला ताबा दाखवून बैस कुटुंबीयांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. प्लॉट हवा असल्यास 7 लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी एसआयटीमार्फत तपास करुन गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी  हरीश ग्वालबंशी याला अटक करण्यात आली आहे.

COMMENTS