मंत्रिमंडळाचे आजचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात

मंत्रिमंडळाचे आजचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात

मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त

 

  1.     राज्यातील ऊस पिकाखालील ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या विशेष योजनेस मंजुरी.

 

  1.    शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी आगामी दोन वर्षासाठीच्या योजनेस मान्यता.

 

  1.    मुलींचा जन्मदर वाढविण्यासह मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारी माझी कन्या भाग्यश्री योजना 1 ऑगस्ट 2017 पासून सुधारित स्वरुपात राबविण्यास मान्यता.

 

  1.   बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार व ॲसिड हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठीच्या मनोधैर्य योजनेच्या निकषात बदल करण्याचा निर्णय.

 

  1.    राज्याच्या फॅब (FAB)धोरणांतर्गत प्रकरणनिहाय अधिकचे भांडवली अनुदान देण्याचा अधिकार मंत्रिमंडळ उपसमितीस देण्यास मान्यता.

 

  1.    धान खरेदी करुन तांदूळ जमा करण्याची प्रक्रिया तसेच भविष्यात भाववाढीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची केंद्र शासनाकडून किंवा खुल्या बाजारातून खरेदी करुन विक्रीची विभागस्तरावरील प्रक्रिया एन.ई.एम.एल (NeML)कंपनीमार्फत करण्यास मान्यता.

 

  1.   राज्य शासनास लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची कार्यपद्धतीचा स्वीकार करण्यास मान्यता.

 

  1.    अमरावती महसूल विभागाच्या मुख्यालयी विभगीय संदर्भ सेवा रूग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उच्चस्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 12 पदांच्या निर्मितीस मान्यता.

 

  1.     शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय दंत महाविद्यालय व दंत व दंतशास्त्र विषयातील गट- अ व गट-ब ची पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळून ती स्वतंत्र निवड मंडळातर्फे भरण्याचा निर्णय.

 

  1. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियमास (मेस्मा) पाच वर्षांसाठी मुदतवाढ.

 

  1. भूविकास बँकांबाबतच्या धोरणात्मक निर्णयात सुधारणा करण्यास मान्यता.

 

 

COMMENTS