मुंबई – आज राज्य मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ते खालील प्रमाणे…
- रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातील इतर व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय.
- एल्फिन्स्टन रोड-परळ पादचारी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विर्डी लघु पाटबंधारे योजनेस (ता. दोडामार्ग) 146 कोटी रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता.
4. किटकनाशकांची फवारणी करताना मृत्यूमुखी पडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत. या प्रकरणाची गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या समितीमार्फत चौकशी. अशा घटना टाळण्यासाठी मोफत मास्क वाटप.
COMMENTS