मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारण्यात  ‘हे’ मंत्री आहेत अव्वल !

मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारण्यात  ‘हे’ मंत्री आहेत अव्वल !

मुंबई, 29 जुलै – राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारण्यात राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर हे अव्वल ठरलेत. तसंच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद सोडता एकाही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकांना उपस्थिती लावली नाही.  दांडी मारणा-या टॉप 5 टॉप दांडी बदाद्दर मंत्र्यांमध्ये पांडुरंग फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, राजकुमार बडोले यांचा क्रमांक आहे.  आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि मंत्र्याची उपस्थितीची माहिती मागितली होती. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. 17 जुलै 2016 पासून 22 मे 2017 या कालावधीत मंत्रिमंडळाच्या एकूण 35 बैठका झाल्या. यातल्या सर्व बैठकांना केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. तर दांडी मारण्यात अव्वल ठरलेल्या पांडुरंग फुंडकर यांनी 35 पैकी तब्बल 11 बैठकांना दांडी मारली आहे. त्यानंतर अर्थमंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही 9 वेळा दांडी मारत दुसरा क्रमांक पटकवला आहे.

COMMENTS