मंत्र्यांची ‘लाल’ दिवा काढण्यासाठी चढाओढ

मंत्र्यांची ‘लाल’ दिवा काढण्यासाठी चढाओढ

व्हीआयपी संस्कृतीला कायमचा लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने लाल दिव्याला हद्दपार केले आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनीही तातडीने लाल दिवे हटवले आहेत. अंमलबजावणीसाठी 1 मे ची वाट न पाहता, लाल दिवे लगेच हटवण्यात आले. मंत्र्यांमध्ये लाल दिवे हटवण्यासाठी जणू चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढून टाकला. मुख्यमंत्री कार्यालयाने फडणवीसांचे फोटो ट्वीटरवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनीही त्यांचा कित्ता गिरवत या निर्णयाचे स्वागत केले. शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही आपल्या गाडीवरील लाल दिवा तातडीने हटवला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, विजय शिवतरे यांनीही लालदिवा काढून टाकला.

लाल दिव्याबाबत असणारी 108 नंबरची तरतूद काढणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. यापुढे फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या गाड्यांना निळा दिवा असणार आहे. लाल दिव्याबाबत असणारी 108 नंबरची तरतूद काढणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

COMMENTS