मंत्र्याच्या तोतया पीएवर गुन्हा दाखल, ‘अशा’ तोतया पीएपासून सावध रहा !

मंत्र्याच्या तोतया पीएवर गुन्हा दाखल, ‘अशा’ तोतया पीएपासून सावध रहा !

नाशिक – गिरीष महाजन यांचा पीए असल्याचं सांगून अनेकांना दादागिरी करणा-या तोतडा पीएला नाशिक पोलिसांनी अटक केलीय. त्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पाटील असं त्या तोतया पीएचं नाव आहे. नाशिकच्या एका हॉटेलमध्ये तो आला होता. त्याला हॉटेलमध्ये रुम बुक करायची होती. हॉटेल मालकाने त्याच्याकडे ओळखपत्र मागितलं. मात्र त्यानं हॉटेल मालकाला दादागिरी करत मी पालमंत्री गिरीष महाजन यांचा पीए असल्याचं सांगत ओळखपत्र देण्यास नकार दिला. दादागिरीकरून हॉटेलमधली रुम बुक केली. थोडावेळ बाहेर गेला आणि पुन्हा परत आला. माझे पैसे परत द्या, मला रुम बुक करायची नाही असा वाद घालू लागला. संदीप पाटीलची हॉटेलमालकाने अधिक चौकशी केली असता तो मंत्रांचा पीए नसल्याचं समोर आलं. त्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी त्याला अटक केले. मंत्र्यांच्या कार्यालयातूनही त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी संदीप पाटील यांने अशाप्रकार किती लोकांना गंडा घातला याचा पोलीस तपास करत आहेत.

COMMENTS