मध्य प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणुक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सलग तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले भाजपचे शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्रीपदाचा तगडा उमेदवार देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्यामध्ये कमलनाथ किंवा ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. कमलनाथ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. अनेकवेळा त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता सोनिया गांधी यांच्यासोबतही कमलनाथ यांनी काम केले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून सलग 9 वेळा निवडूण येण्याचा विक्रम कमलनाथ यांनी केला आहे. तर ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल ब्रिगेडचे युवा नेते आहेत.
COMMENTS