मध्यप्रदेशात राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी नेत्यांना अटक

मध्यप्रदेशात राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी नेत्यांना अटक

मध्य प्रदेशातील मंदसौर मध्ये खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी अटक केलीय. मध्यप्रदेशातल्या बुढामधून  ‘किसान मुक्ती’ यात्राला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली होती.  मात्र शेतकरी यात्रेदरम्यान मंदसौरमधील पिंपलमडिया गावातून शहीद शेतकऱ्यांचे अस्थिलकश नेताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलीय. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

मंदसौर हल्ल्यातील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश राजू शेट्टी दिल्लीतील जंतर मंतरला घेऊन जाणार होते. मात्र हे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी त्यांना अटक केलीय. राजू शेट्टीसह सुमारे 300 शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

 

COMMENTS