मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे काय म्हणाले ?

मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे काय म्हणाले ?

मुंबई –  ‘राज साहेबांवर नाराज नाही, पण त्यांच्या जवळच्या लोकांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे.  शेजारचे लोक राज साहेबांना चुकीची माहिती देत होते. यामुळे आम्हाला विश्वासात न घेता संघटनेत बदल केला.’ असं मतं मनसेतून सेनेत गेलेले नगरसेवक  दिलीप लांडे यांनी व्यक्त केले आहे.

काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर आदींनी  शिवसेनेत प्रवेश केला.

यावर दिलीप लांडे म्हणाले की, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर यांना विश्वासात न घेता विभाग अध्यक्षपदावरून हटवले गेले. या शेजारच्या लोकांची नावे घेवून त्यांना मोठे करणार नाही. ही लोक कोण आहेत राज साहेबांना आणि मनसैनिकांना माहित आहेत. यांच्यामुळेच पक्ष रसतळाला गेलीय. नाराज नगरसेवकांची मोट बांधली नाही, प्रत्येक नगरसेवकावर अन्याय झाल्याने हा उद्रेक झाला आहे. भाजपकडून मनसेच्या नगरसेवकांना ऑफर आल्या होत्या, परंतु त्यांच्या लालचीला ते बळी पडले नाहीत म्हणून ते आता घोडेबाजाराचा आरोप करत आहेत. त्यांच्या पक्षात गेलो नसल्यामुळं पैसे घेतल्याचा आरोप भाजपकडून होतोय. पैसे घेवून जायचं असतं तर ज्या पक्षाकडे अधिक पैसे आहेत त्यांच्याकडं गेले असते. पैशाची लालच असती तर दुस-या पक्षाने घोडेबाजार लावला होता तिकडं गेलो असतो. असे लांडे म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भविष्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचं लांडेंनी सांगितलं, असं संजय तुर्डे म्हणाले होते. यावर दिलीप लांडे म्हणाले की,  संजय तुर्डे खोटे बोलत आहेत. संजय तुर्डेंना मी कुठलीही ऑफर दिलेली नाही.

COMMENTS