मनसेने नियोजित केलेले मेळावे राज ठाकरेंनी केले रद्द !

मनसेने नियोजित केलेले मेळावे राज ठाकरेंनी केले रद्द !

निवडणुकीत पदरी पडलेल्या निराशेला मनसे नेते पुन्हा पक्षाच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेला सरसावले आहे. मात्र या प्रक्रियेला पहिलाच झटका बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील संवाद मेळावे अचानक रद्द केले आहेत.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी खुद्द राज ठाकरे या मेळाव्यांना हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेनेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. मात्र पक्षप्रमुखांच्या परवानगीविनाच काही नेत्यांनी या मेळाव्यांचे आयोजन केल्याचे कळताच राज यांनी हे मेळावेच रद्द केल्याची चर्चा आहे.

पराभवांमुळे आलेले नैराश्य दूर सारत मनसेच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे मेळावे आयोजित घेणार असल्याची माहिती मनसेनेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती.  त्यानुसार 27 एप्रिल ते 5 मे दरम्यान मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात संवाद मेळाव्यांचे आयोजनकरण्यात आले होते. याबाबत आठवड्याभरापूर्वी मनसेचे नेते आणि विभागाध्यक्षांची बैठक पार पडली होती. यात दीड ते दोन हजार पदाधिकारीआणि कार्यकर्ते बसू शकतील अशा सभागृहांची आपापल्या विभागात उपलब्धता तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सर्व विभागात सभागृहाची बुकिंगही करण्यात आली होती . मात्र अचानक मेळावे रद्द करण्यात आल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

COMMENTS