सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ आणि तासगाव तालुक्यात गारांचा जोरदार पाऊस

सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ आणि तासगाव तालुक्यात गारांचा जोरदार पाऊस

सांगली – सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहंकाळ तालुक्यात आज दुपारी जोरदार वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाला. तासगाव तालुक्यातील सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, डोंगरसोनी, दहिवडी, गव्हाण, वज्रचौंडे या गावात गारांचा पाऊस झाला. कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटनान्द्रे, तिसंगी, कुंडलापुर, कुच्ची या गावात वादळी वाऱ्या सह जोरदार पाऊस झाला.

अवकाळी झालेला हा पाऊस द्राक्ष आणि अन्य शेती पिकांना नुकसान ग्रस्त ठरणार आहे. गारपीट आणि पावसामुळे, खरड छाटणी नंतरच्या द्राक्ष बागांच्या कोवळ्या फुटी मोडल्याने द्राक्षबागा उध्वस्थ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात 40 सेल्सियस तापमान आहे. आज झालेल्या पावसामुळे दुष्काळी कवठेमहंकाळ आणि तासगाव तालुक्यात गारवा निर्माण झाला असला तरी, हा पाऊस शेतीसाठी नुकसान करणारा आहे.

COMMENTS