नांदेड – मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसोपचार कक्ष आणि डॉक्टरांच्या भरतीच्या जाहिरातीवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतक-यांची मनोरुग्ण म्हणून तपासणी करणे म्हणजे शेतक-यांची टिंगल असल्याची टीकाही त्यांनी केलीय. शेतक-यांना नव्हे तर मंत्र्यांना मनोरुग्णाच्या उपचाराची गरज असल्याचा टोलाही अशोक चव्हाण यांनी सरकारला लगावला आहे. मुंबईतील एसआरए घोटाळा आणि नागपुरमधील मुस्लिम व्यक्तीला गोमांसच्या संशयावरुन झालेली मारहाण यावरुनही अशोक चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला. एस आर ए घोटाळ्यावरुन सरकारचा हाच पारदर्शी कारभार आहे का असा सवाल केला. तर नागपूरसारख्या घटनांना सरकारची मूक संमती आहे का असाही सवाल केला.
COMMENTS