मराठवाड्यात काँग्रेसला धक्का, दोन माजी आमदार भाजपात दाखल

मराठवाड्यात काँग्रेसला धक्का, दोन माजी आमदार भाजपात दाखल

परभणी – महापौरपदाची माळ काँग्रेसच्या उमदेवराच्या गळ्यात पडली असतानाच पक्षाला जिल्ह्यात जबरदस्त धक्का बसला आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार कुंडलीकराव नागरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  वर्षा बंगल्यावर काल रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेले अनेक दिवस बोर्डीकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. ती खरी ठरली आहे. बोर्डीकर यांच्यावर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप आहेत. त्यातून सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी भाजपाचा रस्ता धरल्याची चर्चा आहे. तसंच त्यांची मुलगी मेघना बोर्डीकर या परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मेघना बोर्डीकर या परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू शकतात.

COMMENTS