मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीच्या संस्थापकावर प्राणघातक हल्ला

मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीच्या संस्थापकावर प्राणघातक हल्ला

महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आज (दि.9) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील टाकळी गावच्या शिवारातील ही घटना आहे. गायकवाड यांना उपचारासाठी जिल्हा रुगाणालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहेत.

गायकवाड यांच्यावरही वाळू व्यवसायातूनच हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हल्लेखोराच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांचे पथके रवाना करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी दिली आहे.

 

COMMENTS