मराठा मोर्चाचा पार्श्वभूमीवर राणेंच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !

मराठा मोर्चाचा पार्श्वभूमीवर राणेंच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !

मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यास मराठा संघटनांनी मान्यता दिली असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आमदारांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे. मोर्चासाठी 22 मागण्या पुढे आल्या असल्या तरी मराठा आरक्षणासह जिव्ह्याळ्याचा प्रमुख मागण्यांवर सरकारने निर्णय घ्यावा, अशी भूमिका गुरुवारी मराठा आमदार आणि संघटनांच्या बैठकीत घेण्यात आली.

9 ऑगस्टच्या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत येणार आहे. राज्यभरातून येणारा मराठा समाज मोर्चातून रिकाम्या हाती परतणार नाही. त्यामुळे राज्य सरकारची मागण्यांबाबत काय भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी व मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची सरकारला जाणीव करुन घेण्यासाठी मराठा आमदारांचे शिष्टमंडळ शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. नारायण राणे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. मराठा संघटना मागण्यांचा मसुदा देणार असून त्यावर हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. मागण्यांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

 

COMMENTS