मराठा मोर्चाला पाकिस्तानातून पाठिंबा !

मराठा मोर्चाला पाकिस्तानातून पाठिंबा !

मुंबईत उद्या (बुधवारी) मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्याला राज्यभरातून पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान या मोर्चाला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानातूनही पाठिंबा मिळत आहे. बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या ‘मराठा कौमी इतेहाद’ या संघटनेने भारतातील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

मराठा ट्राईब या फेसबूक पेजवर मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. फेसबूक पेजवर याबाबतची पोस्ट टाकण्यात आली आहे. मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण मिळावा यासाठी ‘मराठा ट्राईब’नं पाठिंबा दिला आहे. पानीपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मराठ्यांना अफगाणिस्तानमध्ये नेलं जात होतं. पण ते शक्य झालं नाही, त्यामुळे त्यांना बलुचिस्तानात वसवण्यात आलं. तिथं त्यांचं धर्मांतर झालं. पण मराठा असण्याचा त्यांना आजही अभिमान असून त्यांनी नावात मराठा नाव अजूनही जोडलेलं आहे.

COMMENTS