मराठा शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली ?

मराठा शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली ?

मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर दाखल झाल्यानंतर मोर्चातील सहा मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना सोपवले. यावेळी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समाधानकारक चर्चा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रीमंडळची उपसमिती नेमून 2 ते 3 महिन्यात आरक्षणासंदर्भातल्या निकषांचा आढावा घेणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण बेरोजगारांना जास्तीत जास्त लाभ मिळणार तसेच इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील विद्यार्थ्यांप्रमाणे सवलती देऊ केल्या आहेत. त्यामुळे आता शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी असलेली 60 टक्क्यांची अट शिथिल करून 50 टक्क्यांवर आणण्यात आली आहे.

 

COMMENTS