मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय लवकर होईल असा विश्वास आहे – नारायण राणे

मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय लवकर होईल असा विश्वास आहे – नारायण राणे

मुंबई –  ‘मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत उद्या सकाळी 11 वाजता जिजामाता उद्याना जवळून निघणार आहे. संध्याकाळी पाच वाजता जेजे प्लायओव्हरवरून आझाद मैदानावर येईल. आझाद मैदानावर मोर्चातील सहभागी लोक थांबतील. हा मुक मोर्चा आहे, त्यामुळे तिथे भाषणे होणार नाहीत.’ असे  नारायण राणे यांनी सांगितले.

राणे म्हणाले की,  ‘एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला विधिमंडळात येईल. विधिमंडळात शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले जाईल. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पहिला मुद्दा आहे. या शिष्टमंडळासमोर मुख्यमंत्री याबाबत आपलं मत व्यक्त करतील. उद्याच्या मोर्चाला 20 ते 25 लाख लोक येतील असा अंदाज आहे. आजच मोठ्या संख्येने लोक मुंबईत येऊन पोहचले आहेत. मोर्चाबाबत उत्साह आहे, त्यामुळेच हा मोर्चा विराट होईल. सरकारचे चांगल्या प्रकारचे सहकार्य आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकार्य देण्याचे मान्य केलं आहे. तसेच मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय लवकर होईल असा विश्वास आहे.

 

COMMENTS