‘मराठीत सांगितलेलं समजत नाही इंग्लिशमध्ये सांगू का’ म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये 59 मार्क

‘मराठीत सांगितलेलं समजत नाही इंग्लिशमध्ये सांगू का’ म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये 59 मार्क

‘सैराट’ चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेल्या रिंकु राजगुरूने 10 वीच्या परीक्षेत बाजी मारत झिंगाट मार्कस मिळवले आहेत. ‘मराठीत सांगितलेलं समजत नाही इंग्लिश मध्ये सांगू का’ असं म्हणा-या आर्ची म्हणजेच रिंकूला इंग्रजीमध्ये रिंकुला 59 मार्क मिळाले आहे. आज दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला  असून रिंकुला 66.40 टक्के गुण मिळाले आहेत.

डॉक्टर होण्याची इच्छा बाळगलेल्या रिंकुला गेल्या दोन वर्षात अभ्यास करण्यासाठी वेळच मिळाला नव्हता. मात्र बाहेरुन अभ्यास करुन ती थेट परीक्षेला पोहोचली होती.  रिंकुला 10 वीच्या महत्वाच्या वर्षात मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागले. एका बाजूला अभ्यास करायचा होता तर दुसरीकडे ती सैराट चित्रपटाचा कन्नड रिमेक मनसू मल्लिगेमध्ये काम करीत होती. यासाठी तिला कन्नड शिकणे आवश्यक होते. मनसू मल्लिगेचे शूटींग कर्नाटकातील वेगवेगळ्या शहरात पार पडले. या शूटींगच्या पूर्व तयारीमध्ये आणि शूटींगमध्ये तिचे जळपास पाच सहा महिने गेले.  तरीदेखील 66 टक्के गुण मिळवत तिने सर्वांची शाबासकी मिळवली आहे.
यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.  91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे. आज महाराष्ट्रात मुलींनी बाजी मारली आहे.

COMMENTS