महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मनसेने मुंबईतील दादर आणि माहीम भागातील काही दुकानांवर लावलेल्या गुजराती पाट्या काढून पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेने माहीम मधील शोभा हॉटेलवर लावलेली गुजराती भाषेची पाटी काढून टाकली. याशिवाय, दादरमधील पु.ना.गाडगीळचे गुजराची बोर्ड मनसेकडून हटवण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व राज्यांनी हिंदी शिकली पाहिजे ही जबरदस्ती का? असा सवाल एका कार्यक्रमात उपस्थित केला होता. राज्य सरकारच्या एका जीआरमध्ये ‘लोकराज्य’ मासिक हिंदी आणि गुजरातीमध्ये काढण्याची राज्य सरकारची तयारी सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. हिंदी आणि गुजराती भाषिकांसाठी हे मासिक काढण्यात येण्यावरुन राज ठाकरेंनी राज्य शासनाला चांगलेच धारेवर धरले होते.
COMMENTS