मराठ्यानंतर आता ओबीसी एकवटले, आझाद मैदानात एल्गार !

मराठ्यानंतर आता ओबीसी एकवटले, आझाद मैदानात एल्गार !

मुंबई – विविध मागण्यांसाठी काल मराठा समाज आझाद मैदानात धडकला होता. आज ओबीसी समाज आझाद मैदानात एकवटला आहे. विविध मागण्यांसाठी त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. खुल्या वर्गातील मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करु नये अशी त्यांची मागणी आहे.

त्यासोबतच मागासवर्ग म्हसे आयोग तात्काळ रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. केंद्र सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांची कपात केलेली शिष्यवृत्ती पुन्हा पूर्ववत करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करुन लोकसख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

COMMENTS