भ्रष्टाचाऱ्यांना सरकार पाठीशी घालतय का?, खडसेंचा सरकारला घरचा आहेर

भ्रष्टाचाऱ्यांना सरकार पाठीशी घालतय का?, खडसेंचा सरकारला घरचा आहेर

हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतय का? असा समज लोकांमध्ये निर्माण होत असल्याचे मत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. ते विधानसभेत बोलत होते.

जळगाव जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराबाबत चर्चेला आलेल्या लक्षवेधी प्रश्नावर बोलताना खडसे यांनी सरकारला धारेवर धरले. जळगाव जिल्ह्यात शालेय पोषण आहार घोटाळा प्रश्नी विधानसभेत आज प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी खडसे यांनी हे सरकार भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा नागरिकांमध्ये समज निर्माण होत असल्याचे वक्तव्य केले. नागरिकांमधून उपस्थित होत असलेल्या सरकारविरोधी मताची बाजू घेत खडसेंनी सरकारला घरचाच आहेर दिला आहे.

 

COMMENTS