पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांची सरकारी मोटार बंद पडली. एका कार्यक्रमाहून महापौर काळजे हे त्यांच्या कार्यालयात येण्यासाठी त्यांच्या सरकारी वाहनात येऊन बसले, पण काही केल्या त्यांचे वाहन सुरूच होईना. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गाडीला धक्का मारावा लागला.
महापौर नितीन काळजे यांना सरकारी मोटार देण्यात आली आहे. सोमवारी दिघी येथील रामचंद्र गायकवाड महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला महापौर मोटार घेऊन गेले होते. कार्यक्रम संपून येत असताना रस्त्यामध्ये अचानक महापौरांची मोटार बंद पडली. मोटार बंद पडल्यामुळे आपल्याला पालिका कार्यालयात येता आले नाही. शहरातील अनेक नागरिक कामासाठी आपल्याकडे कार्यलयात आले होते. पंरतु, मोटार नादुरुस्त झाल्याने आपण कार्यालयात येऊ शकलो नसल्याचे, महापौर काळजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, च-होली भागात उंच रस्ता असल्यामुळे पालिकेची मोटार रस्त्यांना लागत असल्याची, तक्रार महापौर काळजे यांनी यापूर्वी केली होती. त्यामुळे महापौरांना नवी मोटार हवी असल्याची, चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
COMMENTS