राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा शिवसेनेत

राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.  मीरा भाईंदरच्या माजी महापौर कॅटलिन परेरा यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

मीरा भाईंदर परिसरातील विद्यमान नरगसेवक आणि नगरसेविकांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये नगरसेवक व्हेंटर मेंडोसा, बनोल डिमेलो, भगवती शर्मा, आणि नगरसेविका हेलन जॉर्ज यांचा समावेश होता.

या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या वेळीस ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक आमदार सुभाष भोईर आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS