महाराष्ट्रद्वेशी कन्नड रक्षक वेदिकेचं आमंत्रण मनसेनं स्विकारलं !

महाराष्ट्रद्वेशी कन्नड रक्षक वेदिकेचं आमंत्रण मनसेनं स्विकारलं !

सीमा प्रश्नावरुन महाराष्ट्राविरोधात सतत गरळ ओकणा-या आणि महाराष्ट्राच्या विरोधात उग्र आंदोलन करणा-या कन्नड रक्षण वेदिकेचं आमंत्रण मनसेनं स्विकारलं आहे. प्रादेशिक भाषेच्या मुद्दावर देशातील सर्व प्रादेशिक पक्षांना आणि संघटनांना किमान समान कार्यक्रमवार एकत्र आणण्याचा कन्नड रक्षक वेदिकेचा प्रय़त्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारी बंगळुरुमध्ये एकदिवशीय शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये मनसे सहभागी होणार आहे. मनसेचे नवनियुक्त सरचिटणीस संदीप देशपांडे हे या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. हिंदी भाषेच्या आक्रमणाविरोधात हे संघटन असल्याचं कन्नड रक्षक वेदिकेचं म्हणणं आहे. बेळगाव प्रश्नावरुन मनसे फारशी आक्रमक नसल्यामुळं मनसेला आमंत्रण दिल्याचं बोलंलं जातंय. मात्र शिवसेना सीमा प्रश्नावरुन सातत्याने आक्रमक भूमिका घेतली असल्यामुळे शिवसेनेला आमंत्रण नसल्याचं बोललं जातंय. या एकदविशीय चर्चासत्रासाठी दक्षिणेतील डीएमके, अण्णा डीएमके, तेलगू देशम, तृणमुल काँग्रेस यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. मात्र ते यासाठी येणार का हे अजून स्पष्ट झाललं नाही.

COMMENTS