महाराष्ट्राला फडणवीस यांच्या नेतृत्वाची जास्त गरज –  गडकरी

महाराष्ट्राला फडणवीस यांच्या नेतृत्वाची जास्त गरज – गडकरी

नागपूर –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. केंद्रात चांगले काम करण्याची त्यांची योग्यता आहे. त्यांना केंद्रात बोलवायचे किंवा नाही, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीच निर्णय घेतील. सध्या राज्यात असलेली अनेक आव्हाने बघता त्यांच्या नेतृत्वाची गरज राज्याला आहे, असे मत व्यक्त करून फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याच्या शक्यतेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पडदा टाकला.

नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चेकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला असला तरी तो पंतप्रधानांनी स्वीकारला नाही. मी कालच अमेरिकेतून परतलो. नवीन खात्याची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा माध्यमातून मिळाली. कोणाला कोणते खाते द्यावे, याचे अधिकार पंतप्रधानांना आहे.रस्ते परिवहन आणि शिपिंग मंत्रालयाच्या कामाची व्याप्ती खूप आहे. अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे पुन्हा नव्या खात्याचा भार पेलण्यास आपल्याकडे वेळ नाही, असे गडकरी म्हणाले.

 

COMMENTS