महिलांवरील अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे भाजपच्या खासदार, आमदारांवर – एडीआर

महिलांवरील अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे भाजपच्या खासदार, आमदारांवर – एडीआर

देशातील आमदार आणि खासदार अशा 51 लोकप्रतिनिधींवर महिलांवर बलात्कार, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. 51 पैकी 48 आमदार असून तीन खासदार आहेत. असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्स या संस्थेनं केलेल्या अभ्यासात ही माहिती पुढे आली आहे. हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

पक्ष पातळीवरचा विचार करता आरोपी लोकप्रतिनिधींमध्ये भाजपचे सर्वाधिक प्रतिनिधी आहेत. त्यांच्या 14 सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना 7 आणि तृणमुल काँग्रेसच्या 6 जणांवर गुन्हे दाखल आहेत. या लोकप्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रांच्या अभ्यासावरुन ही आकडेवारी समोर आली आहे.

एडीआर ने देशातली 4896 पैकी 4852 जणांच्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास केला. यामध्ये 776 पैकी 774 खासदार तर 4120 आमदारांपैकी 4078 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करण्यात आला.

महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल असलेल्या 334 जणांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्याचंही पुढे आलं आहे. या 334 पैकी सर्वाधिक उमेदवार हे भाजपचे आहेत. भाजपनं 48 जणांना उमेवारी दिली होती. त्यानंतरचा नंबर बसपाचा लागतो. बसपानं 36 उमेदावारांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रसनं 27 उमेदवारांना उमेदवारी दिली होती.

 

COMMENTS