माजी गृहमंत्र्यांचा हरभरा चोरीला

माजी गृहमंत्र्यांचा हरभरा चोरीला

उस्मानाबाद : माजी गृहमंत्री ड़ॉ. पद्मसिंह पाटील यांच्या शेतातील हरभऱ्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शेतातील हरभऱ्याची मळणी झाली होती. संत गोरोबा काका मंदिराच्या जवळील एका छोट्या गोडावूनमध्ये 250 ते 300 हरभऱ्याचे कट्टे (पोती) ठेवली होती. त्याला लॉक करण्यात आले नव्हते. त्या ठिकाणी एका कामगाराचाही पाहारा होता. रात्रीच्या वेळी कामगार झोपेत असतानाच चोरट्यांनी 13 कट्टे चोरून नेली आहेत. ढोकी (ता. उस्मानाबाद) पोलिस स्टेशनमध्ये यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता चोरट्यांचा कसून तपास करीत आहेत. एका माजी गृहमंत्र्यांच्या हरभऱ्याची चोरी झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

COMMENTS