माजी नगरसेवकाच्या घरात 40 कोटींचं जुन्या नोटांचं घबाड

माजी नगरसेवकाच्या घरात 40 कोटींचं जुन्या नोटांचं घबाड

बंगळुरु – बंगळुरु पोलिसांना शुक्रवारी माजी नगरसेवक व्ही. नागराज यांच्या कार्यालयावर मारलेल्या छाप्यामध्ये जुन्या नोटांचे घबाड सापडले. पोलिसांनी या छाप्यामध्ये 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटांची बंडले जप्त केली. ही रक्कम 40 कोटींच्या घरात आहे.

मागच्यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी सरकारने 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. तेव्हापासून काळा पैसा शोधून काढण्यासाठी इन्कम टॅक्स खाते आणि राज्य पोलिसांकडून संशयितांच्या निवासस्थानी, कार्यालयांवर धाड सत्राची कारवाई सुरु आहे.

आयकर विभागाने ऑपरेशन क्लीन मनीच्या दुस-या टप्प्याला सुरुवात केली असून यावेळी 60 हजार लोक त्यांच्या रडारवर आहेत. या सर्वांची आयकर विभाग कसून चौकशी करणार आहे. नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर बाजारात आलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या हेतूने ऑपरेशन क्लीन मनी कारवाईला सुरुवात झाली आहे.

COMMENTS