माजी नगसेविका विशाखा मैंद यांचा कार अपघातात मृत्यू

माजी नगसेविका विशाखा मैंद यांचा कार अपघातात मृत्यू

नागपूर – नागपूरच्या धरमपेठ परिसरातील माजी नगरसेविका विशाखा मैंद याचे आज (शुक्रवार) सकाळी सौंसरजवळ अपघाती निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार,’ मध्यप्रदेशातील सौंसरजवळ त्यांच्या तवेरा गाडीला आज सकाळी अपघात झाला. गाडीचा टायर फुटल्यामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

विशाखा मैंद यांच्या मृत्यूची वार्ता त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी पसरताच शोककळा पसरली आहे.

विशाखा मैंद या 2012 च्या महापालिका निवडणुकीत बिनविरोध नगरसेविका म्हणून जिंकून आल्या होत्या. मात्र 2016 मध्ये भाजपने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्या बंडखोर म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या

COMMENTS