“माझे वडील जरी भाजपच्या तिकीटावर उभे राहिले, तर त्यांनाही मतदान करू नका”

“माझे वडील जरी भाजपच्या तिकीटावर उभे राहिले, तर त्यांनाही मतदान करू नका”

गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तुम्हाला अनेक गाजरे दाखवली जातील. ते तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र, या सगळ्याला भुलू नका. एवढेच काय माझे वडील भाजपच्या तिकीटावर उभे राहिले, तर त्यांनाही मत देऊ नका, असे आवाहन पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने केले आहे. जुनागड जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी झालेल्या सभेत बोलताना त्याने राज्यातील पाटीदार समाजाला भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले.

हार्दिकचे वडील भरत पटेल जुनागढमधील केशोद मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने भाजपविरोधी मोहीम उघडली आहे. जुनागड जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी झालेल्या सभेत बोलताना त्याने राज्यातील पाटीदार समाजाला भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले.

COMMENTS