नाशिक – मालेगाव महानगरपालिकेच्या निकालांकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या निवडणूकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. मालेगाव महापालिका निवडणूकीत काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 28 जागा मिळाल्या आहेत, तर 26 जागा घेऊन राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर आहे.
शिवसेनेला 13 जागा मिळाल्या असून भाजपाचे 9 जागा मिळवत आपले स्थान बळकट केले आहे. एमआयएमने मालेगावमध्येही प्रवेश केला असून या पक्षाचे 7 उमेदवार निवडून आले आहेत. जनता दलाला 6 जागा मिळाल्या असून एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरा महाज यांनी मनपा निवडणुकीत आघाडी केली होती. त्यामुळे त्यांचे पक्षीय बल 26 पर्यंत पोहोचले आहे.
मालेगावमध्ये त्रिशंकु स्थिती निर्माण झाली असून, महापौर होण्यासाठी 43 हा आकडा कोणता पक्ष मिळवतो याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
COMMENTS