‘मासा’ भेटला म्हणून मासा मारला – नारायण राणे

‘मासा’ भेटला म्हणून मासा मारला – नारायण राणे

सिंधुदुर्ग – मच्छीमारांच्या वादात नितेश राणे यांनी केलेले आंदोलन हे योग्यच होते. मासा भेटला म्हणून मासा मारला, असे मत मांडत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे.
कुडाळ येथील पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, पारंपरिक-पर्ससीन मच्छीमारांच्या वादात नितेश राणे यांनी केलेले आंदोलन हे योग्यच होते. मासा भेटला म्हणून मासा मारला. आंदोलनाचे मी समर्थन करतो. मात्र, मासा मारलेल्याचे समर्थन नाही. कारण, तो एक आंदोलनाचा भाग आहे.
नितेश राणे यांनी केलेल्या आंदोलनानंतर नितेश राणेंसह शंभर जणांवर गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाचे समर्थन केले. यापुढेही पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय झाल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.

सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना फक्त ढोलच वाजवते. शिवसेनेची वैचारिक पातळी नाही. अशीही टीका त्यांनी केली. यावेळी राणेंनी जीएसटीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, जीएसटीमुळे गरिबी कशी दूर होईल ?  जीएसटीमुळे हॉटेल्स बंद पडायची वेळ आली .

COMMENTS