जळगाव – राजकारणात कोणी कोणाचा कायमचा कट्टर शत्रू किंवा मित्र नसतो. याची प्रचिती आपल्याला अनेकवेळा येते. जळगावमधल्या एकनाथ खडसे आणि सुरेश दादा जैन यांच्यातील राजकीय वैर अख्या महाराष्ट्राचाल माहित आहे. जेंव्हा हे दोघे राजकारणात सक्रीय होते. तेंव्हा दोघेही एकमेकांचं राजकीय कारकिर्द संपवायला निघाले होते. त्यातून जमीन घरकुल घोटाळ्यात जैन यांना साडेचार वर्ष तुरुंगवास झाला. त्यामुळे ते राजकारणापासून काहीसे दूर गेल्यासारखं चित्र निर्माण झालं आहे. तर इकडे भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन खडसेंना मंत्रीपद गमवावं लागलं. त्यामुळे सध्याच्या राजकारणात दोन्ही नेते काहीसे अडगळीत पडल्यासारखे झाले आहेत. एका कार्यक्रमासाठी दोन्ही नेते जळगावात एकत्र आले होते. तेंव्हा दोघांनी एकमेकांना गरमागरम भजी भरवली. मात्र ती भजी मिरचीची होती. त्यामुळे मिरचीची भजी खडसे जैन यांच्यात गोडवा निर्माण करते की तिच्या चवीप्रमाणे तिखटपणा निर्माण करते हे येत्या काही दिवसात दिसून येईलच.
COMMENTS