विखे पाटलांच्या भाजप गुणगाणावर काय म्हणाले अशोक चव्हाण ?

विखे पाटलांच्या भाजप गुणगाणावर काय म्हणाले अशोक चव्हाण ?

मुंबई – विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोंडभरुन स्तुती केली. एवढच नाही तर मागच्या सरकारच्या काळातील मंत्र्यांपेक्षा फडणवीस सरकारमधील मंत्री चांगले आहेत असं सर्टिफिकीटही देऊन टाकलं. त्यामुळं काँग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सूर आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे पाटलांच्या वक्त्यव्यावर नाराजी व्यक्त केलीय. जे काही विचारायचं आहे ते थेट विखे पाटील यांनाच विचारा असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS