मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे हे आत्मचरित्र लिहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हे आत्मचरित्र लिहिण्यास सुरूवात केली आहे. दररोज सकाळी दीड ते दोन तास ते याचे लिखाण करत आहेत. पुढच्या वर्षी 10 एप्रिलला राणे यांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी ते प्रकाशीत केलं जाणार आहे.
आत्मचरित्रात त्यांच्या बालपणीपासूनते आतापर्यंतच्या घडामोडींचा वेध घेतला जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेतील त्यांची जवळपास 4 दशके आणि काँग्रेसमधील एक तप यातील अनेक गौप्यस्फोट केले जाण्याची शक्यता आहे. राणेंचा रोखठोक स्वभाव पहाता त्यातून अनेक बाबी त्याच्यातून पुढे येतील अशी अपेक्षा आहे. राणेंचं आत्मचरित्रात नेमके काय गौप्यस्फोट काय असतील याची उत्सुकता सर्व महाराष्ट्रला लागली आहे.
COMMENTS