मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबईच्या नायगावमधील बीडीडी चाळीचा पुनर्विकासाचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. शापुरजी पालनजी आणि एल अँड टी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे.

नायगावमधील बीडीडी चाळीतील सध्याच्या सदनिका 160 चौ. फुटांच्या आहेत. पुनर्विकासानंतर बीडीडी चाळीतील रहिवाशांना 500 चौ. फुटांच्या सदनिका देण्यात येणार आहे. दोन आठवड्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे.

 

COMMENTS