सकल मराठा क्रांती मोर्चाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. येत्या 9 ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चा मुंबईत धडकणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने आज मुंबईतील सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
या मोर्चासाठी वातावरणनिर्मिती यासाठी 6 जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे निमित्त राज्यभर महामोर्चा आणि मराठा समस्यां याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 13 जुलैला कोपर्डी येथील क्रांती ज्योतीला श्रद्धांजलि वाहून अभियानाचा आढावा घेतला जाईल. सर्व मराठी बांधवाना या मोर्च्यात सामील करण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन याविषयी माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यादरम्यान सरकारला विविध मागण्याकरीता निवेदनही देण्यात यईल.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफीसह उच्च शिक्षणात सवलत देण्याची मागणी केली जाईल, यावेळी अँट्रेसिटी कायद्याबद्दल समन्वय समितीने आपले मत स्पष्ट केले . त्यांच्या मते अँट्रेसिटी रद्द करण्याची मागणी केली नाही, कायद्यातील गैरवापर रद्द करण्याची मागणी आम्ही करत आहोत, सरकारसोबत चर्चा करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. शेतकरी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने घेतलेला निर्णय येत्या 8 दिवसांत जाहीर करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी समितीतर्फे करण्यात आली.
COMMENTS