मुंबई – मुंबईचे कंबरडे मोडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आज (बुधवारी) सकाळही कायम आहे. मुसळधार पावसामुळे धावणारी मुंबई मंगळवारपासून थांबली होती. या पावसाच्या पाण्यामुळे तुंबलेल्या मुंबईतील लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवादेखील ठप्प झाली आहे. त्यामुळे मुबंईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहराला आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.
आज पश्चिम मुंबई सकाळपासून पाऊस सुरु झाला. आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे गरजेचे असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याच पाश्वभूमीवर मुंबईतल्या शाळा कॉलेजेसला आज सुट्टी देण्यात आल्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारपासून ठप्प असलेली मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेन अखेर पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, लोकल धीम्या गतीने धावत आहेत. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे सुरु असून रेल्वे गाड्या काहीशा उशिराने धावत आहेत. तर दुसरीकडे रस्ते वाहतूकही पुन्हा सुरळीत होत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा सुरु झाला आहे. मात्र सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यानं आजही मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन सेवा मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून ठप्प आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विक्रोळी आणि ठाण्यात दोघ घरे कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS