मुंबईत रेल्वे ट्रेक जवळील परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. हा भाजीपाला पिकवण्याकरीता नाल्याच्या पाण्याचा, ड्रेनेजच्या पाण्याचा उपयोग केला जातो. हा भाजीपाला मुंबईत राजरोसपणे बाजारात विकला जातो. असा भाजीपाला खाण्यास अत्यंत घातक आहे. त्यामुळे हा भाजीपाला पिकवण्यास बंदी घालावी अशी मागणी भाजपाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. संबधित जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी या विषयी चर्चा करून सदर भाजीपाला तपासण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. सदरचा भाजीपाला खाण्यास घातक असल्याचा अभिप्राय संबधित अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे आ. केळकर यांनी पत्रात नमूद केले आहे. शिवाय या भाजीपाल्याची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी करून घेण्याची आवश्यकता असल्याची मागणीही त्यांनी या पत्राद्वारे रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. नागरिकांच्या जीवाशी एकप्रकारे खेळले जात असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळेच यावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे.
Older Post
एसटी बस स्थानकात ‘सावध राहा’ !
COMMENTS