मुंबईसह कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस

मुंबईसह कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसात मुंबई आणि कोकण परिसरात मान्सून जोरदार सक्रिय झाला आहे. येत्या 48 तासात या भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक वेधशाळेने वर्तवला आहे.
बंगालच्या उपमहासगरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरही त्याचा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे कोकण आणि मुंबई परिसरात वातावरण ढगाळ असून येत्या 48 तासात या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

COMMENTS