मुंबई- नागपूर तीन महामार्ग असताना चौथा हवा कशाला? –  शरद पवार

मुंबई- नागपूर तीन महामार्ग असताना चौथा हवा कशाला? – शरद पवार

‘मुंबईहून नागपूरला जायला आधीच तीन महामार्ग असताना मग चौथा महामार्ग हवा कशाला’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  केला आहे.  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही सुरू केली आहे. मात्र या प्रकल्पाला शेतक-यांनी तीव्र विरोध केला आहे. याच पाश्वभुमीवर आज (दि.12) शेतक-यांनी पवारांची भेट घेतली होती.

यावेळी शरद पवार म्हणाले, ‘सरकारला विकासासाठी निर्णय घ्यावा लागतो मात्र विकासाचा चेहरा मानवी असावा, उध्वस्त करणारा नको. अजून जूनी काम पूर्ण झाली नाहीत आणि आता समृद्धी महामार्गावर नवी शहर निर्माण करणार आहेत मात्र याला किती वेळ लागेल याचा अंदाज आहे का? विकास जमिनी शिवाय होणार नाही मात्र विकास करताना कुणाला उध्वस्त करू नका,  रस्त्यावर आणू नका. राज्य सरकरची भूमिका अन्याय कारक असेल तर त्याला विरोध व्हायला हवा. समृद्धी मार्गामुळे अनेक मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करतेय’ असा आरोप पवारांनी केला.

सर्व भागातील प्रतिनीधी आणि मुख्यमंत्री बैठक करायला हवी, लोकांचे आक्षेप मुख्यमंत्र्यानी ऐकावी आणि मार्ग काढावा…गूगलवर पाहणी केली आणि निर्णय घेतले, ख़ाली काय आहे हे पहिलाच नाही, साक्षात जाऊन पाहणी केल्यावर यांना नक्की त्या जागेवर काय आहे ते कळेल, असा टोलाही पवारांनी लगावला.

COMMENTS