अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 10 वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 10 वर्षांची शिक्षा

उस्मानाबाद –  एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कळंबमधील घडली होती. याप्रकरणी नराधमाला 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात विशेष सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा सुनावली आहे.

चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार केला होता. याप्रकरणी कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस स्टेशन मध्ये 11 मार्च ला गुन्हा दाखल झाला होता. फास्ट ट्रॅक कोर्ट नसतानाही कमी कालावधीत हा निकाल लागला आहे.

COMMENTS