मुंबई – मुंबई महापालिका शाळांतही आता वंदे मातरम् कंपलसरी करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात आज महापालिका शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. भाजप नगरसेवक संदिप पटेल यांनी ठरावाचा हा प्रस्ताव मांडला. मनपा आयुक्त अजॉय श्रीवास्तव यांच्याकडे अभिप्रायासाठी हा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी होईल.
काँग्रेस आणि सपाचा विरोध डावलून शिवसेना-भाजपाने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयावरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
COMMENTS