नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला – शरद यादव

नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला – शरद यादव

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपसोबत जाऊन  सत्ता स्थापन केल्यामुळे त्यांनी बिहारच्या 11 कोटी जनतेचा विश्वासघात झाला आहे, अशी टीका जदयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी केली आहे. नितीशकुमारांनी महाआघाडीपासून फारकत घेऊन खूप मोठी चूक केली आहे. त्यांचा हा निर्णय अत्यंत विश्वासघातकी आहे. आमची महाआघाडी 5 वर्षांसाठी होती, असेही यादव यांनी म्हटले आहे.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते अहमद पटेल विजयी झाल्यानंतर यादव यांनी ट्विटरवरून पटेल यांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे यादव यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली. त्यातच त्यांनी थेट नितीशकुमार यांच्या निर्णयाविरोधात उघड वक्तव्य केल्याने त्यांची पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता बळावली आहे.

 

COMMENTS