मुंबई 1993 स्फोट प्रकरण : अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा, ताहिर मर्चंटला फाशी

मुंबई 1993 स्फोट प्रकरण : अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा, ताहिर मर्चंटला फाशी

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्‍या 1993 च्या  मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना आज शिक्षा सुनावण्यात आली. विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलेल्या मास्टरमाइन्ड  कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह इत्तर सहा जणांचा यामध्ये समावेश आहे. अबू सालेमला  जन्मठेप आणि 2 लाखांचा दंडशिक्षा सुनावण्यात आली. करिमुल्लाह खानला  जन्मठेप आणि 2 लाखांचा दंड तर ताहिर मर्चंटला फाशीची शिक्षा, रियाझ सिद्दीकी  10 वर्षांची शिक्षा  सुनावण्यात आली.  मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला़ होता.

देशभरात गाजलेल्या मुंबई बॉम्बस्फोटाची घटना 12 मार्च 1993 रोजी घडली होती. त्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेत 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. मुंबई शेअर बाजाराच्या तळमजल्यात झालेल्या स्फोटात 50 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुढील 2 तासात झालेल्या 13 बॉम्बस्फोटांनी मुंबई शहर हादरुन गेले होते.

COMMENTS