मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारायण राणेंच्या घरी !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारायण राणेंच्या घरी !

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा श्रीगणेशा झाल्यात जमा आहे.  काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणेशाचं दर्शन घेतलं. रात्री साधारण साडेअकरा वाजता मुख्यमंत्री राणेंच्या घरी गेले होते. जवळपास तासभर ते मुख्यमंत्र्यांच्या घरी होते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

यावेळी घरगुती चर्चेसोबतच राजकीय प्रश्नावरही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत आहेत. त्यावेळी राणे हे अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे. जर इतर बोलणी पूर्ण झाली तर त्यांचा प्रवेशही उद्या होऊ शकतो.

COMMENTS