मुख्यमंत्र्यांना संवाद यात्रा काढावी लागली हे विरोधकांच्या संघर्ष यात्रेचे यश आहे. शेतकरी संपाच्या आडून विरोधकांचा हिंसेचा डाव, हे मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदार वक्तव्य असून. विरोधक शेतक-यांचे दु:ख मांडणार नाही तर कोण मांडणार. उत्तर प्रदेश निवडणुकीआधी कर्जमाफीची घोषणा केली ती पूर्ण केली. मग महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्जमाफी, सात बारा कोरा करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते ते का पूर्ण करत नाहीत असा खडा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला केला.
पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 31 लाख थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफी द्यायला 30 हजार कोटी लागतील असे सांगत एवढे पैसे उभे करणे राज्याला शक्य नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट बघत असाल लवकर निवडणुका घ्या पण कर्जमाफी करा किंवा कर्जमाफी करणार नाही असे स्पष्ट सांगा. कर्जमाफी झाली पाहिजे आणि स्वामीनाथन आयोगाची हमीभावाची मागणी तात्काळ मान्य झाली पाहिजे यापूर्वीही अशी आंदोलने झाली होती, फ्रान्समध्येही शेतक-यांनी असे आंदोलने केले होते. या आंदोलनाला विरोधक फुस लावतेय असे अकलेचे तारे तोडू नये. शिवसेनेची कर्जमाफीची मागणी आहे तर मंत्रीमंडळ बैठकीत सेना निर्णय का घेत नाही, शिवसेनेचा दांभिकपणा आहे, अशी चव्हाण यांनी टीका केली.
COMMENTS