शिवसेनेचे वरातीमागून घोडे, शेतकरी संपाला अखेर दिला पाठिंबा !

शिवसेनेचे वरातीमागून घोडे, शेतकरी संपाला अखेर दिला पाठिंबा !

राज्यातील ऐतिहासीक शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. दिवसागणीक संपाला पाठिंबा देणा-यांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे संपाची धारही अधिक तीव्र होत आहे. संपाला एवढा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यामुळे आणि सरकारविरोधात असंतोष वाढत असल्याचं पाहून अखेर शिवसेनेनंही आता शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांनीच एक प्रसिद्धीपत्रक काढून शेतकरी संपाला संपूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. खरंतर शेतकरी कर्जमुक्तीची मागणी शिवसेनेनं या आधिही केलेली आहे. मात्र या संपाला पाठिंबा दिला नव्हता. मात्र संपाला मिळणारा प्रतिसाद पाहून शिवसेनेनंही अखेर संपाला पाठिंबा दिला आहे. सरकारनं शेतक-यांवर लाठीमार करु नये असंही शिवसेनेतर्फे सरकारला सांगण्यात आलं आहे. शेवटी सत्तेत असतानाही पाठिंबा दिला हेही नसे थोडके. देर आये दुरुस्त आहे असं म्हणूया.

COMMENTS