मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत पुढील निवडणुकीसाठी मतदान यंत्राद्वारे मतदान न घेता पारंपरिक मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असा ठराव पारित करण्यात आला आहे.
फेटरी ग्रामपंचायतीची दोन महिन्याने निवडणूक आहे. 15 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत आगामी निवडणुकीसाठी मतदान मतपत्रिका टाकूनच घेतले जावे, असा ठराव पारित करण्यात आला. फेटरीला मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यापासून हे गाव चर्चेत आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यासन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या गावाच्या विकास योजनांवर लक्ष दिले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुद्धा वेळोवेळी या गावाला भेट देऊन कामाची पाहणी करतात.टेक्नोसेव्ही मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या ग्रामपंचायतींनी आधुनिक पद्धतीच्या मतदानाला केलेला विरोध हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
COMMENTS